Thursday, February 12, 2009

'अभिमान', 'विक्रांत' गेले तरी कुठे? 29/06/08 ma.ta

गेली दोन वर्षं दररोज न चुकता साडेआठ वाजता टीव्हीवर 'असंभव' मालिका लावून बसणाऱ्या मराठी प्रेक्षकांना गेले दोन आठवडे 'अभिमान सरंजामे' आणि 'इन्स्पेक्टर विक्रांत भोसले' यांचे दर्शनच झाले नाही. ही कॅरॅक्टर्स गेली कुठे, याबाबत प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असतानाच 'अभिमान' चिन्मय मांडलेकर यांनी पटकथा, संवादलेखक म्हणून तर 'विक्रांत' सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शक म्हणून 'असंभव'मधून अंग काढून घेतल्याचे खात्रीशीररित्या समजले आहे. त्यामुळे, या गूढ मालिकेचे गूढ अजून वाढले आहे.
लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी 'असंभव' दोन महिन्यांत संपणार, अशी बातमी 'मुंबई टाइम्स'ने दिली होती. तेव्हा 'झी मराठी'ने याचा इन्कार केला होता. मालिका महत्त्वाच्या वळणावर आली असताना अभिमान आणि विक्रांत गायब झाले आहेत. हा कथेचाच भाग असेल, असे वाटत असेल, तर मालिकेची श्रेयनामावली पाहा. लेखक चिन्मय मांडलेकर आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांची नावे दोन दिवसांपासून तिथूनही गायब आहेत. या दोघांनी महिन्याभरापूवीर्च ही मालिका सोडली असल्याची कबुली दिलीय.
'निर्मात्यांशी काही गोष्टीत मतभेद झाल्यामुळे आम्ही दोघांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला',असे स्पष्टीकरण चिन्मयने दिले. मात्र निर्माती पल्लवी जोशी यांनी याचा इन्कार केला. 'ही मालिका आहे. एकच दिग्दर्शक शेवटपर्यंत राहण्याची गरज नाही. प्रत्येक मालिकेचे टेक्निशियन, कॉस्चुम डिझायनरही बदलत असतात. तेव्हा हा काही मोठा बदल नाही आणि आमच्यात काही वाद झालेले नाहीत,' असं त्या म्हणाल्या. 'निर्माती आणि आम्ही काम करण्यासाठी एक कालावधी ठरवला होता. तो संपला. काही गोष्टींवर चर्चा केली. काही गोष्टी व्यवस्थित होऊ शकत नाहीत, असं लक्षात आलं आणि आम्ही मालिकेतून बाहेर पडलो. पण आमच्यात कोणत्याही प्रकारचे भांडण झालेलं नाही', असं सतीशने सांगितलं. कुटुंबाची अतिरिक्त जबाबदारी हेही कारण त्याने दिलं.
गेली दोन वर्षांची यशस्वी टीम बदलण्याचं कारण विचारलं असता पल्लवी म्हणाल्या की कधी कधी चिन्मयचं स्क्रिप्ट तयार नसायचं, ते आम्ही इतरांकडून करून घ्यायचो. कधी सतीश डिरेक्ट करायचा नाही तर त्याचा असिस्टण्ट डिरेक्टर करायचा, असंही झालंय. अशा गोष्टी होतच असतात.' सतीशने मात्र 'मी ४०९ भाग एकटा उभा राहून पूर्ण केले आहेत. कधीच असिस्टण्ट डिरेक्टरवर जबाबदारी दिली नाही. एका वेळी मी एकच काम करतो. त्यामुळे दुसऱ्या कामासाठी गैरहजर राहण्याचा प्रश्ान्च येत नाही


[Satish Rajwadenni asambhav 1st July la sodli. Sodnyacha nemka karan kadhich samor ala nahi pan tyancha absence prekshkanna khup janavala. Ani eka mahinyat maharastra times ne toch prashna chapun anla jo anekanna padlela, amcha vikrant gela kuthe? Tyavelchya ma.ta. madhla he article.]

No comments:

Post a Comment