Tuesday, October 20, 2009

त्यात गैर काय? Mumbai times 21st Oct 2009

एकानेच दोन सिनेम सादर केलेत. एक हिंदी दुसरा मराठी. दोन्ही एकाच दिवशी रिलीज होतायत. 'जेल'समोर उभं ठाकण्यात 'गैर' काय?

हिंदीतला कितीही बडा निर्माता असला, तरी रिलीजच्या वेळेस त्याचा भर स्पर्धा टाळण्यावरच असतो. पण 'गैर'चे आणि 'जेल'चे सादरकतेर् असलेल्या संजय घोडावत यांनी हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज करण्याचं धाडस केलंय. दोन दगडांवर पाय ठेवण्याचा ही रिस्क त्यांनी दोन्ही सिनेमांवर विश्वास असल्यामुळे घेतलीय म्हणे.

मराठी 'गैर' आणि हिंदी 'जेल' हे दोन महत्त्वाकांक्षी सिनेमे ६ नोव्हेंबरला रिलीज होतायत. 'जेल' हा मधुर भांडारकरचा सिनेमा. त्यामुळे चचेर्त असणारच. त्यातल्या पण झळकण्यापूवीर्च 'गैर'चीही भरपूर चर्चा सुरू आहे. संजय घोडावत ग्रुपची या दोन्ही सिनेमात महत्वाची भूमिका आहे. पण स्पधेर्ची शक्यता लक्षात घेऊनही त्यांनी हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय.


निर्माते जी. प्रशांत याबद्दल बोलताना म्हणाले की गैरच्या निमिर्तीत संजय घोडावत यांच मोठं सहकार्य आम्हाला लाभलं. मराठी सिनेमाच्या इतिहासात चॉपर वापरण्याचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न असावा. एक कोटीचा सिनेमा अशी जाहिरात करणे वेगळं आणि पडद्यावर तो खर्च दिसणं वेगळं. 'गैर' हा सिनेमा एका जाहिरातक्षेत्रातल्या एका बड्या हस्तीच्या भोवती फिरतो. त्याचं ऊंची आयुष्य दाखवण्यासाठी खर्च आलायय अॅड र्वल्डचा सम्राट होंडा सिटीतून फिरतोय असं दाखवता येईल. पण आजचा मराठी प्रेक्षक ते स्वीकारणार नाही. म्हणून आम्ही सिनेमात फेरारी, मसिर्डीज आणि लेक्सस वापरली. सिनेमाचं बरच शूट एका आलिशान फार्म हाऊसवर झालंय, असं प्रशांत यांनी सांगितलं. सिनेमात दिसलेलं चॉपर, महागड्या गाड्या आणि आलिशान फार्महाऊस सगळंच घोडावत यांच्या मालकीचं. पण हे सगळं मिळूनही सिनेमाचं बजेट दोन आणि माकेर्टिंग धरून तीन कोटींच्यावर गेलं.

'गैर' हा सस्पेन्स थ्रीलर आहे. सिनेमात एका कमशिर्अल कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरून संदीप कुलकणीर् उडी मारतो असं दृश्य आहे. संदीपने डुप्लिकेटचा वापर न करता हे दृश्य दिलंय. कास्टिंग करतानाही आम्ही सर्वच कलाकारांची लूक टेस्ट घेतली. गाण्यांसाठीही कुणाल गांजावाला, हरिहरन असे कलाकार घेतले. सिनेमाच्या श्रीमंतीसाठी आम्ही घेतलेलं कष्ट पडद्यावर दिसतीलच, असं ते सांगतात. हा सिनेमा जेलसमोर रिलीज होणार आहे. याच आम्हाला अजिबातच टेन्शन नाही. मराठी सिनेमा दजेर्दार असला तर मराठी प्रेक्षक त्याला उचलून धरतो, असा अनुभव आहे, असा विश्वास ते व्यक्त करतात.

तीन देशात प्रीमिअर
मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने ग्लोबल करण्यासाठी टोराण्टो, लंडन आणि दुबई या तीन शहरांमध्ये 'गैर'चा प्रीमिअर शो करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. ते पुढे म्हणालंे, आम्ही आणखी एक अभिनव प्रयोग करतो आहोत. 'गैर'च्या शूटिंगमध्ये सामील असणाऱ्या ४२ कलाकारांचा एका वर्षाचा आम्ही अपघात आणि मेडिकल इन्शुरन्स करून घेतला होता. मराठी सिनेमाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं होतं.

Source:- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5143441.cms

No comments:

Post a Comment